चक्क सासू-सासऱ्याच्या बेडरूममध्ये सुनबाईने लावले छुपे कॅमेरे , आता म्हणतेय की..

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक खळबळजनक अशी घटना उघडकीला आलेली असून एका सुनेने सासु सासर्याच्या बेडरूममध्ये गुप्त कॅमेरे लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे. सुनेने आपल्या सासू-सासऱ्याचे अश्लील व्हिडीओ या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले आणि त्यानंतर घरातून सुमारे दोन कोटी रुपयांचे दागिने आणि दीड लाख रुपये रोकड घेऊन ती फरार झाली.लग्न झाल्यापासून तिचे इतरत्र अफेअर असल्याने सासू-सासर्‍यांशी पटत नव्हते त्यामुळे तिने हा प्रकार केला असे समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीतील लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला असून आरोपी महिलेचे चार वर्षांपासून तिच्या कॉलेजच्या मित्रासोबत प्रेमसंबंध होते. सासू-सासर्‍यांना या प्रकाराची माहिती समजल्यानंतर त्यांच्यात भांडणे सुरू झाली म्हणून तिने तिच्या प्रियकरासोबत याविषयी चर्चा केली त्यावेळी त्याने तिला हा प्रकार करण्यास सांगितले. त्यानुसार सुनेने सासु सासर्याच्या बेडरूममध्ये कॅमेरे लावले आणि त्यात काही आक्षेपार्ह व्हिडीओ त्यात रेकॉर्ड झाले त्यानंतर ही सून दागिने आणि रोकड घेऊन फरार झाली. आपल्यावर पोलिस कारवाई केली तर आपण हे सर्व व्हायरल करू असे देखील ती आता म्हणत आहे.

पीडित कुटुंबीय दिल्लीतील लक्ष्मीनगर येथे वास्तव्याला असून चांदणी चौकात त्यांचे दागिन्याचे दुकान आहे. पीडित व्यक्ती हा आई-वडिलांसोबत राहत असून त्याचा भाऊ हा वेगळा राहतो. तक्रारदार तरुण यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झालेला होता मात्र पत्नीचे लग्नाआधी प्रियकरासोबत संबंध असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाले. पत्नीला अनेकदा समजावून देखील ती पतीला दाद देत नव्हती आणि प्रियकरासोबत तिचे प्रकरण सुरूच होते.

पाच सप्टेंबर रोजी पतीने तिच्या मोबाईलमध्ये पतीने मित्राचा अश्लील मेसेज पाहिला त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला त्यानंतर पीडित पतीने पत्नीच्या मित्राचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याला संपर्क साधून भेटायला बोलावले. मित्राने त्याची माहिती प्रियसीला दिली मात्र त्याआधीच तिने सासू-सासर्‍यांचे असले व्हिडिओ आणि हे दागिने घेऊन घरातून पलायन केले. आता सध्या ती दागिने आणि रोकड परत देण्यास नकार देत असून जर पोलिस कारवाई केली तर हे व्हिडिओ व्हायरल करू असे म्हटले आहे. तक्रारदार यांनी आई वडिलांशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी पोलिसात जाण्याचा सल्ला दिला आणि याविरोधात गुन्हा दाखल झाला.