माझा नवरा ‘ नालायक ‘ , शोधून देणाऱ्यास पत्नीने केले बक्षीस जाहीर

देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून मध्य प्रदेश येथील अलोट इथे राहणारे विक्रम नवातीया यांचे सपना नावाच्या एका तरुणीसोबत 2012 साली लग्न झाले होते. त्यांना दोन मुले देखील आहेत. सध्या सपना या ग्रामपंचायत कार्यालयात सहाय्यक सचिव पदावर कार्यरत असून लग्नानंतर काही वर्षात त्यांचे आणि पती विक्रम यांच्या भांडणे होऊ लागली होती. आपला पती आपल्याला रोज मारहाण करायचा असे देखील सपना यांचे म्हणणे आहे.

सपना यांना ‘ हुंडा माहेरून घेऊन ये ‘ असे म्हणत आपल्याला पैशासाठी तो सतत त्रास देत होता असे म्हटले आहे . त्या त्रासाला त्या कंटाळलेल्या होत्या अन अशातच त्यांचा पती घरातून दोन लाख रुपये रक्कम, दागिने आणि मोटारसायकल घेऊन एका महिलेसोबत पळून गेलेला आहे. हतबल झालेल्या सपना यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिलेली असून ‘ माझा पती कुठे आढळून आला तर तात्काळ मला संपर्क करा किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क करा ‘ असे म्हटले आहे.

सपना यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकलली असून त्यामध्ये पतीला त्यांनी ‘ नालायक ‘ असे म्हटलेले आहे. सोशल मीडियावर त्यांनी म्हटले आहे की ‘ माझा पती हा एक दुष्ट माणूस आहे. तो रोज निष्पाप मुलींना आपल्या जाळ्यात अडकतो आणि त्यांचे शोषण करतो त्यानंतर त्यांना सोडून देतो. सध्या तो आलोट येथे राहणाऱ्या एका मुलीसोबत पळून गेलेला आहे. मला आणि माझ्या दोन मुलांना त्याने वाऱ्यावर सोडले असून हा माणूस तुम्हाला कुठेही दिसला तर मला संपर्क साधा त्याबद्दल तुम्हाला योग्य ते बक्षीस देखील दिले जाईल. कृपया मला मदत करा आणि माझ्या पतीला जास्तीत जास्त शिक्षा करा जेणेकरून अनेक निष्पाप मुलींचे आयुष्य खराब होणार नाही ‘ सपना यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आलोट पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला असून तपासाला सुरुवात केलेली आहे.