
देशातील वाढती महागाई बेरोजगारी आणि सामाजिक एकोपा देशात रहावा या उद्देशाने काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे अशी टीका काँग्रेसने सोमवारी केलेली असून राहुल गांधी यांच्या भाजप जोडो यात्रेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या गोटात भीती आणि नैराश्य पसरलेले आहे असेही म्हटले आहे. नेहमीप्रमाणे प्रश्नांना उत्तर न देता खोडसाळपणे यात्रेबाबत अपप्रचार करण्याची खेळी भाजपने सुरू केलेली आहे असे देखील काँग्रेसने म्हटले आहे. गौरव वल्लभ यांनी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना पाच ट्रिलियन म्हणजे पाचवर किती शून्य असा प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर संबित पात्रा यांना देता आले नव्हते.
काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, ‘ देशात भाजपने 2014 पासून भारत तोडो यात्रा काढलेली आहे. घाणेरडा केला जात असलेला अपप्रचार, उघडपणे खोटे बोलणे यातून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. देशासाठी ही अत्यंत धोकादायक बाब असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद आम्हाला पाहायला मिळत आहे. देशवासीयांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद पाहून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे.
भारत जोडो यात्रेबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भाषणे आणि त्यांची कृती यावरून त्यांचे नैराश्य दिसून येत आहे असे देखील ते पुढे म्हणाले. मागील आठ वर्षात भाजपने देश उध्वस्त केला असून एका व्यक्तीविरुद्ध सरकारने संपूर्ण शासकीय यंत्रणा लावून स्वतःची भूमिका बरोबर असल्याचे सिद्ध करण्यावर जोर दिलेला आहे. भाजपचे तामिळनाडूचे आयटी सेलचे प्रमुख सी टी आर निर्मलकुमार यांनी राहुल गांधी यांच्यावर अत्यंत विखारी टीका केली त्यावरून त्यांची खरी मानसिकता दिसत आहे या टीकेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींची माफी मागावी अशी देखील गौरव वल्लभ पुढे म्हणाले. निर्मल कुमार यांच्या खालच्या पातळीवर केलेल्या टीकेवर केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी या का गप्प आहेत ? असा देखील सवाल त्यांनी केला आहे .