संतापजनक..तडीपारीची नोटीस घेऊन गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात पुन्हा एकदा एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर परिसरात राहत असलेल्या एका व्यक्तीला तडीपारीची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या शहर पोलीस ठाण्यातील एका पोलिसावरच हल्ला करण्यात आलेला आहे त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यानी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पोलीस नाईक किरण पवार असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून वरूण सोमनाथ कुदळे असे आरोपीचे नाव असल्याचे समजते. त्याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणला तसेच पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. किरण पवार हे एकोणीस तारखेला अशोकनगर परिसरातील राऊत वस्ती येथे तडीपारीची नोटीस बजावण्यासाठी गेले होते.

आरोपीने त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर हल्ला केला असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील हद्दीत गुन्हेगारी रेकॉर्डवरील सोमनाथ कुदळे हा अशोकनगर येथे राऊत वस्ती परिसरात राहतो. त्याला हद्दपारीची नोटीस बजावण्यासाठी पोलीस नाईक पवार हे गेले होते. तिथे गेल्यानंतर आरोपीने पवार यांना धमकावले तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील नुकसान केले आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसास देखील जर अशी आरोपी मारहाण करत असतील तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न आता उभा राहिलेला आहे.