बसमधील ‘ त्या ‘ प्रकारावर पुणेकर झाले बघेकर , तरुणी म्हणतेय की ..

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एक वेगळेच प्रकरण समोर आले असून पीएमएमपीएमएलमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने अत्यंत उद्धटपणाचे वर्तन एका तरुणीसोबत केलेले आहे. प्रवासी असलेल्या या तरुणीला धक्काबुक्की करत तिचे केस ओढत या कंडक्टरने उतरून दिल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडलेला आहे. पीडित तरुणीने सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूर तसेच जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांच्याकडे तक्रार दाखल करून संबंधित वाहका विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

22 वर्षीय तरुणीच्या म्हणण्याप्रमाणे, ‘ ऑफिसला जाण्यासाठी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी तळेगाव स्टेशन चौकातील बसथांब्यावर वडगाव कात्रज बस मध्ये आपण आलेलो होतो. मागच्या दारात आणि पुढच्या बाजूला प्रवाशांची गर्दी होती म्ह्णून मधल्या भागात उभे राहण्यासाठी बर्‍यापैकी मोकळी जागा होती मात्र तिथे जाण्यासाठी कंडक्टरला थोडे सरकून जागा करून देण्याची विनंती केली त्यावर कंडक्टर याने ‘ मी काय आता खाली उतरू का ‘ असे उद्धट उत्तर दिले. आपण त्याला नीट बोलण्याची विनंती केली मात्र त्याने आपल्यासोबत वाद घालण्यास सुरू केली आणि ‘ तुला जास्त त्रास होत असेल तर बस थांबवतो तू उतर ‘ असे देखील तो म्हणाला.

कंडक्टरकडून असे उद्धट वर्तन तरुणीला अपेक्षित नव्हते म्हणून तिने तुमच्या या वर्तनाबद्दल मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करेल असे सांगितले असता त्याने तिला धमकावण्यास सुरू केले. तरुणीने कंडक्टरचा फोटो काढला म्हणून तो आणखीनच भडकला आणि तिच्या पाठीवरील बॅग ओढून तिला धक्काबुक्की देखील केली. तिचे केसदेखील या कंडक्टरने ओढले. बसमध्ये इतरही प्रवासी होते मात्र त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असेही तरुणीचे म्हणणे आहे.

तरुणी पुढे म्हणते की, संबंधित वाहक हा इतरही प्रवाशांशी अशाच पद्धतीने बोलत होता. बसचालकाबद्दल देखील त्याने सर्वांच्या समक्ष अपशब्द वापरले. इतर प्रवाशांना कामाला जाण्याची घाई असल्याने ते त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. नागरिकांच्या पैशातून पगार घेत असलेल्या या वाहकाने आपल्यासोबत अत्यंत चुकीचे वर्तन केलेले आहे त्यामुळे आपल्या विभागाची देखील बदनामी झालेली आहे म्हणून आपल्याकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या उद्धट कंडक्टरच्या विरोधात कारवाई करण्यात यावी ‘ असे म्हटले आहे.