‘ मी तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी ‘, राहुरीतील शिक्षिकेला आपल्या जाळ्यात ओढले अन..

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात उघडकीला आलेली असून तालुक्यातील एका शाळेतील 36 वर्षीय शिक्षकाने राहुरी येथील एका 41 वर्षीय शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केलेले आहेत. त्यानंतर ही महिला गरोदर राहिल्यानंतर या शिक्षकाने तिचा फसवून गर्भपात देखील केला. 20 तारखेला पीडित महिलेने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली असून तिच्यावर अत्याचार करणारा आणि तिला जीवे मारण्याची धमकी देणारा अशा दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, योगेश अण्णासाहेब थोरात ( राहणार घुलेवाडी तालुका संगमनेर ) असे या आरोपीचे शिक्षकाचे नाव असून त्याच्यासोबत गणेश शेंगाळ ( राहणार संगमनेर ) याने या पीडित शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी दिली होती म्हणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पीडित शिक्षिका ही राहुरी येथील राहणारी असून योगेश थोरात याच्यासोबत तिची जुलै 2019 मध्ये एका कामासंदर्भात ओळख झाली होती. त्यावेळी दोघेही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्याने त्यांच्या फोनवरून बोलणे होत होते त्यानंतर व्हाट्सअपवरती ते एकमेकाच्या संपर्कात राहायला लागले त्यावेळी आरोपी योगेश याने या महिलेला अनेक अश्लील मेसेज पाठवले . महिलेने त्याला ‘ मी तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे त्यामुळे आपण मैत्रीच्या अशा मर्यादा ओलांडणे योग्य नाही ‘ असे त्याला सांगितले.

आरोपी योगेश या महिलेला ‘ माझे तुझ्यावर प्रेम आहे आहे . मी आयुष्यभर लग्न करून तुझा सांभाळ करील ‘ असे म्हटल्यानंतर महिलेला त्याचबद्दल विश्वास निर्माण झाला आणि त्यानंतर महिलेने त्याला वेळोवेळी मदतही केली. आतापर्यंत या महिलेने त्याला तीन लाख पन्नास हजार रुपये दिलेले आहेत मात्र महिलेला काहीही न सांगता त्याने घरच्यांच्या संमतीने लग्न करून टाकले आणि लग्न झाल्यानंतर देखील तो मी माझ्या नवीन पत्नीला घटस्पोट घेऊन लवकरच तुझ्यासोबत कोर्ट मॅरेज करणार आहे असे देखील त्याने सांगितले.

25 जून 2022 रोजी योगेश थोरात याने या महिलेला राहुरी येथे भेटण्यासाठी बोलावले आणि तिला घरी सोडण्यासाठी जात असताना कारमध्ये तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकारानंतर महिला गर्भवती राहिली त्यावेळी त्याने तिचा नारळाच्या पाण्यात फसवून औषध देऊन तिचा गर्भपात देखील केला. सोनोग्राफी केल्यानंतर तिच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आपल्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर या शिक्षिकेने योगेश थोरात याच्याबद्दल काही माहिती काढली त्यावेळी त्याने संगमनेर इथे देखील अशाच पद्धतीने सात ते आठ महिलांना धोका दिलेला आहे असे महिलेचे म्हणणे आहे . आरोपीकडून मला माझ्या जीविताला धोका आहे असे महिलेने फिर्यादीत म्हटले असून पोलिस उपनिरीक्षक निकिता महाले हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत