पुण्यात सरकारी कर्मचाऱ्याने केली आत्महत्या , पाच जणांवर गुन्हा दाखल

शेअर करा

पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढत असल्याची एक घटना समोर आलेली असून सावकारी जाचाला कंटाळून पुण्यातील मंगळवार पेठ येथे बालाजी हाइट्समध्ये राहणाऱ्या एका सावकाराच्या जाचाला कंटाळून चक्क सहकार विभागाच्या लेखा अधिकाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे . सदर घटनेनंतर बेकायदा सावकारीपासून सरकारी अधिकारी देखील सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, गणेश शंकर शिंदे ( वय 52 ) असे आत्महत्या केलेल्या अधिकार्‍याचे नाव असून गणेश शिंदे यांना मुंबईतून पुण्यात बदली हवी होती यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्याकडे भरभक्कम रकमेची मागणी केली त्यामुळे शिंदे यांनी सावकाराकडून तीस टक्के व्याजाने तब्बल 84 लाख 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी गणेश शिंदे यांचा या सावकाराने आर्थिक आणि मानसिक छळ सुरू केला मात्र अखेर त्यांनी या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.

सदर प्रकरणी शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी, बाळकृष्ण शिरसागर,गणेश साळुंके, अनिश हजरा यांच्याविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर चार जणांना अटक करण्यात आली आहे. गणेश शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू असल्याचे समजते .


शेअर करा