‘ माझी मुलगी उरुसात हरवली ‘, नागरिकांनी शोध घेतला तेव्हा चक्क ..

शेअर करा

राज्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून पालघर जिल्ह्यातील जव्हार इथे आईने तिच्या तीन वर्षाच्या मुलीचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे . पोलिसांनी कारवाई करत अवघ्या काही तासात आरोपी महिलाला बेड्या ठोकलेल्या असून तिला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

जव्हार बायपास रोडवर अचानकनगर येथे राहणारी आरोपी अफसाना उर्फ तारा सुलेमानी ( वय 37 वर्ष ) या महिलेने तिच्या स्वतःच्या पोटच्या तीन वर्षाच्या साना नावाच्या मुलीचा खून केला आणि आणि त्यानंतर तिचा मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात ठेवून उकिरड्यावर फेकून दिला. मुलीचा खून केल्यानंतर तिने आपली मुलगी ही उरूस मध्ये हरवली अशी देखील आवई उठवली.

त्यानंतर नागरिकांनी मुलीचा शोध सुरू केला त्यावेळी उकिरड्यावर गोणीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकरण उघडकीला आल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली त्यानंतर तिने खुनाची कबुली दिली. अवघ्या काही मिनिटात पोलिस तिथे पोहोचले त्यावेळी तिला नागरिकांनी भरपूर चोप दिलेला होता.

सानाची आई इतरांच्या घरात घरकाम करत असून आपल्या तीन मुलांसह पतीपासून विभक्त होऊन मागील दोन वर्षापासून एकटी राहत होती. तिची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्या घरात नेहमीच पैशांवरुन वाद होत होते. याच आर्थिक चणचणीला कंटाळून आरोपी आईने तीन वर्षीय चिमुकल्या सानाची हत्या केल्याचा अंदाज पालघर पोलिसांना आहे.

आरोपी महिलेला एकूण तीन अपत्ये आहेत. ज्यात दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. या महिलेला 14 आणि 12 वर्षांची दोन मुले आहेत तर तीन वर्षांच्या चिमुकलीची तिने हत्या केली मात्र हत्येचं खरं कारण काय होतं हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.


शेअर करा