अंकिता भंडारीच्या हत्येमागचे कारण आले समोर, भाजप नेत्याची गाडी जमावाने फोडली

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना उत्तराखण्ड इथे समोर आली असून देहराडून इथे एका रिसॉर्टमध्ये नोकरी करणाऱ्या अंकिता भंडारी या १९ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर शनिवारी येथील राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळत आहे . सदर रिसॉर्ट हे एका भाजप नेत्याच्या मुलाच्या मालकीचे हे रिसॉर्ट असून या तरुणीच्या हत्येचे कारण समोर आल्यानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक व सहव्यवस्थापक यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

भाजप नेत्याच्या या रिसॉर्टमध्ये स्वागतिका असणाऱ्या अंकिताने तेथील उतारूंना ‘ विशेष सेवा’ देण्यास नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिस महासंचालक अशोककुमार यांनी दिली असून शनिवारी तिचा मृतदेह एका कालव्यात सापडल्यानंतर स्थानिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. स्थानिकांनी या रिसॉर्टची तसेच भाजप आमदार रेणू बिश्त यांच्या कारची तोडफोड केली आहे .

आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी सोमवारी केली होती..रिसॉर्टच्या मालकांनी माझ्या मैत्रिणीस तेथील पाहुण्यांना शरीरसुख देण्याची सूचना केली होती. परंतु तिने नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली, असा आरोप या तरुणीच्या मित्राने केला आहे .’ तिने मला कॉलही केला होता व मी खूप संकटात सापडल्याचे तिने सांगितले होते मटार काही वेळाने रात्री साडेआठनंतर तिचा फोन बंद झाला व अनेक प्रयत्न करूनही आमचा संपर्क होऊ शकला नाही’, असेही तो म्हणाला आहे .

तरुणाने यानंतर रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य याच्याशी संपर्क साधला मात्र ती तिच्या खोलीत झोपायला गेली आहे, असे त्यास पुलकितने सांगितले. या तरुणाने दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पुलकितला कॉल केला मात्र तेव्हा त्याचा फोन बंद आढळून आला त्यामुळे या तरुणाने या रिसॉर्टचा व्यवस्थापक अंकित याला कॉल केला त्यावर त्याने ती आत्ता जिममध्ये आहे असे सांगितले मात्र तरुणाने यानंतर शेफला फोन केला तेव्हा त्याने या तरुणीस मी कालपासून पाहिले नाही असे सांगितले. .

पोलिसात प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत या तिघांना अटक केली. रिसॉर्टजवळ असणाऱ्या लोणच्याच्या कारखान्यास शुक्रवारी रात्री आग लागल्याने पुरावे नष्ट करण्यासाठी ही आग लावण्यात आली, असा आरोप स्थानिकांनी केला असून पक्षनेते विनोद आर्य व त्यांच्या दोन्ही मुलांची भाजपने शनिवारी हकालपट्टी केली आहे .

पुलकित आर्य हा या प्रकरणातील आरोपी असून त्याच्यासह त्याचा भाऊ अंकित आर्य याचीही भाजपने गच्छंती केली. विनोद आर्य हे हरिद्वार येथील मोठे नेता असून अंकित हा राज्य ओबीसी आयोगाचा उपाध्यक्ष होता. सदर तरुणी १८ तारखेपासून बेपत्ता असूनही चार दिवसांनंतर एफआयआर नोंदवण्यात आला हे धक्कादायक असून उत्तराखंडात महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करन माहरा यांनी केली आहे .


शेअर करा