पुणे हादरलं..’ तुझ्या बायकोला कधी ना कधी पळवून नेईन अन तुला..’

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाबद्दल पतीने पत्नीच्या प्रियकराला जाब विचारला मात्र प्रियकराने तिच्या पतीलाच जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरून हे पती-पत्नी गाव सोडून पुण्यात रहायला आले मात्र तिथेही हा प्रियकर पोहोचला आणि त्याने पत्नीला घेऊन जाण्याची धमकी दिली म्हणून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अजिंक्य शिवाजी घुले ( राहणार टाकळी तालुका बीड ) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जुलै 2022 पासून तर सप्टेंबर 2022 पर्यंत हा प्रकार सुरू होता. पतीने गळफास घेतल्यानंतर मयत पतीच्या भावाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

मयत व्यक्ती यांची पत्नी हिच्यासोबत आरोपी अजिंक्य याचे प्रेमसंबंध होते. सदर प्रकरणी फिर्यादी व्यक्तीच्या भावाला ही माहिती मिळाल्यानंतर त्याने आणि पतीने आरोपीला जाब विचारला त्यावेळी आरोपीने पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रियकराने दिलेल्या धमकीनंतर अखेर हे दांपत्य पुणे येथे राहायला आले त्यानंतर आता तरी आरोपी आपला पाठलाग करणार नाही असे तिला वाटत होते.

काही दिवस उलटल्यानंतर आरोपी प्रियकर हा पुण्यात दाखल झाला आणि तो फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणी आला त्यानंतर त्याने ‘ एक ना एक दिवस तुझ्या बायकोला पळवून घेऊन जाईल ‘ असेच असे म्हणाला तसेच ‘ तुझादेखील काटा काढेल ‘ अशी पतीला धमकी दिली. त्याच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आपल्या भावाने आत्महत्या केली असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.


शेअर करा