‘ आपका दिल बहुत बडा है ‘ ,अपहरण करण्याचा केला होता प्लॅन पण ..

शेअर करा

काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे अपहरणाचा कट रचण्याचा प्रकार समोर आलेला होता. बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि भाजपचे नेते चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट समोर आलेला होता मात्र या अपहरण कांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आणि पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. आपल्या दिलदार स्वभावासाठी परिचित असलेले राधेश्याम चांडक यांनी उदार मनाने त्यांना माफ केले असून यापुढील काळात चांगले कार्य करुन जगा असे देखील प्रोत्साहन दिलेले आहे. तुम्हाला काही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी कडून कर्जदेखील देऊ असे देखील त्यांनी त्यांना आश्वासन दिले.

अत्यल्प काळात श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारी मार्गाचा पर्याय निवडत शहरातील तीन युवकांनी राधेश्याम चांडक आणि चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट रचला होता. आयबीला याप्रकरणी खबर लागताच तीन युवकांना दिल्ली ताब्यात घेण्यात आले होते त्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुरू होणार होती मात्र त्या आधीच राधेश्याम चांडक यांनी त्यांना माफ केले असून आपल्या दिलदार स्वभावाचा परिचय दिलेला आहे.

राधेश्याम चांडक यांनी या तरुणांना बोलावून घेतले त्यावेळी हे तरुण अक्षरश: रडत होते त्यांनी चांडक यांची माफी मागितली त्यानंतर राधेश्याम चांडक यांनी त्यांना ‘ तुम्हाला मी माफ केलेले आहे मात्र यापुढील काळात चांगल्या मार्गाने जगा. तुम्हाला स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी कर्जपुरवठा देखील करू मात्र चुकीचे पाऊल उचलू नका ‘, असे सांगत त्यांचे प्रबोधन केले त्यानंतर या मुलांनी आणि त्यांच्या आई वडिलांनी राधेश्याम चांडक यांना ‘ आपका दिल बहुत बडा है ‘ असे म्हणत त्यांचे आभार मानले आहेत .


शेअर करा