मराठा समाजाबद्दल तानाजी सावंत यांचे ‘ आक्षेपार्ह ‘ वक्तव्य , सोशल मीडियात संताप

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत आले असून त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल बोलताना एक संतापजनक असे वक्तव्य केलेले आहे. सत्तेत आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची पावले उचलली त्यानंतर मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे असेही ते म्हणाले मात्र याही पुढे जात त्यांनी एक वादग्रस्त असे वक्तव्य केले आहे .

उस्मानाबाद येथे हिंदुत्व गर्जना कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली त्यावेळी त्यांनी ,’ सत्तांतर झालं की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे ‘ असे म्हटले आहे. तानाजी सावंत यांनी अशा स्वरूपाची भाषा वापरल्यामुळे त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून मराठा समाजातून त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळत आहे. तानाजी सावंत यांनी यापूर्वी देखील अनेकदा वादग्रस्त विधाने केलेली असून मराठा समाजाबद्दल तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणात गदारोळ होण्याची शक्यता आहे मात्र त्याआधीच त्यांनी माफीही मागितली आहे .