चोरी गेलेल्या फोनचे पुढे होते काय ? आरोपींनी सांगितला फोनचा पुढचा प्रवास

शेअर करा

भारतात मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरणारे व्यक्ती असून मोबाईल चोरीचे देखील मोठे रॅकेट देशभरात कार्यरत आहे. फोन चोरी झाल्यानंतर अनेक नागरिक पोलिसात तक्रार देखील देत नाही फक्त सिमकार्ड बदलून घेतात मात्र चोरी केलेले हे फोन चक्क परदेशात वापरले जात असल्याचा खुलासा मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केलेला आहे.

मुंबई पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेतले होते त्यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी 135 फोन जप्त केले. जप्त केलेल्या फोनची किंमत ही सुमारे बावीस लाख असून अत्यंत महागडे अशी हे फोन विकत तरी कोण घेतो ? असा प्रश्न पोलिसांनी आरोपींना विचारला होता त्यावेळी आरोपींनी जी माहिती सांगितली ते ऐकून पोलिस देखील चकित झाले.

त्रिपुरा येथे तीन जणांना या प्रकरणी अटक केली होती त्यावेळी त्यांनी सांगितले की सर्वात आधी फोन चोरल्यानंतर आम्ही तो फोन बंद करतो. त्याची छायाचित्रे बांगलादेश आणि नेपाळमधल्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवले जातात. तिथे एखादा फोन घेणारा किंवा स्थानिक विकणारा व्हाट्सअप ग्रुपवर ऑर्डर देतो आणि ऑर्डरप्रमाणे मोबाईल कुरियरने सीमाभागात पाठवले जातात .

टोळीतील इतर सदस्य हे फोन सोडून घेतात त्यानंतर जंगलातून हे फोन बांगलादेशात पोहोचवले जातात. तिथे गेल्यानंतर फोनवरील आयएमईआय नंबर काहीच उपयोगाचा राहत नाही. तज्ञ असलेल्या मंडळींशी संपर्क करून तो नंबर काढून टाकण्यात येतो आणि देशाबाहेर गेलेल्या फोनचा तपास करण्यास यंत्रणेला देखील मर्यादा येतात. अशाच पद्धतीने देशभरात मोबाईल चोरीचे रॅकेट कार्यरत असून चोरीला गेलेले हे फोन बांगलादेश नेपाळ या ठिकाणी कमी भावात मिळत असल्या तिथे देखील या फोनला मोठे मार्केट आहे असेही आरोपींनी सांगितले आहे.


शेअर करा