ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक तरी.., निर्मला सीतारामन काय म्हणाल्या ?

शेअर करा

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मी दौरा करत असताना वातावरण इतके गरम का झाले ? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेला असून राष्ट्रवादीत घराणेशाही असून काका पुतण्याचे राजकारण सुरू आहे अन त्यातून भ्रष्टाचार जन्म घेत आहे असे म्हटले आहे.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, घराणेशाही अन भ्रष्टाचाराच्या विरोधात बारामतीत भरपूर काम करण्यासारखे आहे त्यासाठी कोणाच्या दबावाला बळी पडू नका. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून अशा दबावाला घाबरण्याचे कोणतेच कारण नाही. तालुक्यातील अनेक गावांना अद्याप पाणी नाही, समतोल विकास झालेला नाही. एकाच भागात सगळ्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. भाजपचे आमदार अन लोकप्रतिनिधी असलेला भाग जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवलेला आहे. जिथे भाजपचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता असेल त्याला टार्गेट केले जात असून देशाच्या विकासासाठी गाव जिल्हा आणि राज्याचा सर्वांगीण विकास व्हायला हवा तर मग भाजपला का टारगेट केले जात आहे असेही त्या म्हणाल्या.

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, ‘ ज्या पक्षाच्या नावात राष्ट्रवाद आहे त्यांच्याकडून हे अपेक्षित नाही. ईव्हीएम आल्यापासून सर्व काही ठीक ठाक असले तरी बूथ प्रमुखांनी बोगस मतदार शोधून काढावेत आणि निवडणूक प्रक्रियेत लक्ष घालावे. जेव्हा पक्ष सांगेल तेव्हा यापुढे आपण बारामतीला येऊ आणि प्रत्येकाशी वैयक्तिक नाते तयार करू, असेही त्या पुढे म्हणाल्या.


शेअर करा