भक्कम पगाराची थायलंडमध्ये नोकरी ? परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला इशारा

शेअर करा

देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून देशाच्या अंतर्गत नोकऱ्या मिळण्यास असंख्य तरुणांना अडचणी येत आहे त्यामुळे काही तरुण परदेशात आपल्याला चांगला जॉब मिळेल या आशेने प्रयत्न करत असतात तसेच विविध प्लेसमेंट एजंसी यांना देखील भेट देऊन आपली माहिती त्यांना देतात. त्याचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर परदेशात नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या भारतीयांनी तेथील कंपन्या संस्था आणि नोकर भरती करणारे एजंट यांची विश्वासार्हता तपासून पहावी , असा इशारा सरकारकडून देण्यात आलेला आहे. म्यानमार येथे असेच एक प्रकरण समोर आले होते या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सोशल मीडियावर सध्या थायलंडमधील आयटी कंपनीत मोठ्या प्रमाणात रोजगार आहेत अशा जाहिरातींचा सुळसुळाट सुरू झालेला आहे मात्र थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी इंडस्ट्री विकसित झालेली नाही त्यामुळे हा केवळ फेक जॉब अन फसवेगिरीचा प्रकार आहे. भारतात आयटी इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात विकसित झालेली असून यातील कुशल भारतीय उत्तम पगाराच्या नोकरीवर देखील कार्यरत आहे. त्यांना केवळ आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणे असे चित्र दिसत असून बँकॉक आणि म्यानमार येथून हे रॅकेट कार्यरत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये फेक जॉब रॅकेटमध्ये काही भारतीय अडकले होते. आयटी कंपनीतील नोकरीच्या नावाखाली त्यांची भरती करण्यात आली मात्र त्यांना अवैधरित्या म्यानमार येथे नेण्यात आले आणि तिथे गेल्यानंतर अत्यंत वाईट परिस्थितीत त्यांना काम करण्यास भाग पाडले . म्यानमार येथे अडकलेल्या साठ भारतीयापैकी काही जणांना भारतीय दूतावासाच्‍या मदतीने सोडण्यात आलेले आहे. या लोकांना जिथे ठेवण्यात आले होते तो परिसर थायलंडच्या सीमेला लागून असून तिथे सरकारचेही नियंत्रण नाही तर काही कट्टरपंथी टोळ्या धुमाकूळ घालत आहेत त्यामुळे नागरिकांनीही सावध राहावे ‘ असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे .


शेअर करा