चंडीगड प्रकरणाची व्याप्ती वाढली , एका लष्करी जवानाला बेड्या

शेअर करा

चंडीगड विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलमधील अश्लील स्वरूपाच्या व्हिडिओ प्रकरणी चक्क लष्करी जवान असलेल्या व्यक्तीचे नाव आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे. संजीव सिंह असे आरोपी असलेल्या लष्करी जवानाचे नाव असून त्याला पंजाब पोलिसांनी अरुणाचल प्रदेश येथून त्याला अटक केली आहे.

पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांच्या म्हणण्यानुसार चंडीगड विद्यापीठात या विद्यार्थिनीला अटक करण्यात आलेली आहे. तिला संजीव सिन्हा ब्लॅकमेल करत असावा असा आम्हाला संशय आहे. संजीव सिंह यास आम्ही ताब्यात घेतलेले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे लवकरच घटनेमागचे सत्य काय ते समोर येईल असे म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेश येथील सेला या ठिकाणावरून संजीव याला अटक करण्यात आलेली असून दोन दिवस त्याला पोलिसांच्या रिमांडमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी एका विद्यार्थिनीसह तीन जणांना अटक केली होती त्यानंतर या जवानाला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे .


शेअर करा