अच्छे दिन ! अबकी पार रुपया ८१ पार , निर्मला सीतारामन यांचा अजबच तर्क

शेअर करा

भारताचे चलन असलेल्या रुपयाचे रोज नव्याने अवमुल्यन होत असून डॉलरच्या तुलनेत रुपया ८१ रुपयांच्या पुढे घसरत गेलेला आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी पटाईत असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात एक विधान केलेले असून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक मजबूत झालेला आहे असे म्हटले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 81 रुपयांच्या पुढे गेलेली असून त्यामुळे सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर रिझर्व बँक आणि अर्थमंत्रालय लक्ष ठेवून आहेत मात्र तरी देखील अशा स्वरूपाचे निर्मला सीतारामन यांचे विधान म्हणजे जबाबदारी झटकण्याचाच एक प्रकार असल्याची टीका सोशल मीडियावर केली जात आहे

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, चलनातील चढ-उताराच्या सध्याच्या स्थितीत जर जागतिक पातळीवर कोणत्या चलनाने आपली आर्थिक स्थिती चांगली राखली असेल तर तो म्हणजे भारतीय रुपया आहे. आम्ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली आहे. सध्याच्या घसरणीच्या काळात डॉलरच्या तुलनेत इतर चलनांच्या स्थितीचा देखील अभ्यास करण्याची गरज आहे.

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन या अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या आहेत. ‘ मी कांदा खात नाही ‘ इथपासून तर प्रत्येक वेळी जबाबदारी झटकण्याचे काम केंद्राच्या शीर्ष नेतृत्वापासून तर आमदारापर्यंत भाजपचे नेते करत आहेत. सुरुवातीला रशिया युक्रेन वादाचे कारण पुढे करत पेट्रोल डिझेलचे दर वाढवले त्यानंतर गॅसचे देखील दर वाढवले. प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय परिस्थितीला जबाबदार ठरवणाऱ्या केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आपल्या नागरिकांचे वाढत्या महागाईपासून रक्षण करण्याची जबाबदारी का समजत नाही ? असादेखील एक प्रश्न आहे .


शेअर करा