नगरमध्ये ‘ भगर ‘ अंगावर बेतली, नवरात्रात तब्बल इतक्या जणांना विषबाधा

शेअर करा

काही दिवसांपूर्वी बीड येथे भगर खाल्ल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याला विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले होते त्यानंतर तशीच दुसरी घटना आता नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात उघडकीला आलेली असून करंजी आणि खंडोबा वाडी येथील काही ग्राहकांनी भगर आणि भगरीचे पीठ विकत घेतले होते त्यानंतर त्यांना देखील तसाच प्रकार झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या दुकानाचा परवाना आता रद्द केलेला आहे.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी आणि खंडोबावाडी येथील काही व्यक्तींनी एका दुकानातून भगर आणि भगरीचे पीठ विकत घेतलेले होते त्यानंतर त्यांनी या भगरीची भाकरी बनवली आणि ती खाल्ली मात्र त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. सुमारे १५ पेक्षा जास्त लोकांना सुरुवातीला उलट्या आणि मळमळ झाली त्यानंतर इतरही आणखी काही जणांना तशाच स्वरूपाचा त्रास होऊ लागल्याने या प्रकाराची अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दखल घेतली आणि करंजी येथील निलेश सुभाष साखरे याच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला.

नवरात्रीच्या निमित्ताने साखरे याने नगर येथील एका दुकानातून तीस किलोचे कट्टे खरेदी केले होते आणि त्याची किरकोळ विक्री केली होती. काही जणांनी त्याच्याकडून भगर आणि भगरीचे पीठ विकत घेतले आणि त्याची भाकरी बनवून खाल्ली. त्यांना उलटी आणि मळमळ असा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भगर आणि भगरीच्या पिठामुळे गावातील सुमारे पंधरा लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आल्यावर अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी त्याच्या किराणा दुकानात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि 28 सप्टेंबरपासून पुढील आदेश मिळेपर्यंत त्याचा अन्न आणि औषध परवाना रद्द करण्यात आलेला आहे.


शेअर करा