संघावर बंदी ? देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार समाचार , म्हणाले की ..

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानंतर आता अनेक राजकीय पक्षांकडून आरएसएसवर देखील बंदी घालण्यासाठी चर्चा सुरू झालेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांचा याआधी गुन्ह्यात सहभाग आढळून आलेला आहे त्यामुळे संघावर बंदी घालण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे मात्र या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात टीका केली असून संतापही व्यक्त केलेला आहे.

पीएफआय या संघटनेवर पाच वर्षे बंदी घालण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी देखील संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी पीएफआय सारख्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे तर देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील बंदी घातली पाहिजे. संघावर याआधी देखील बंदी घालण्यात आली होती. हिंदू मुस्लिम करून समाजात दुफळी माजविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे गरजेचे आहे. हिंदू मुस्लिम करून समाजात तणाव निर्माण करणे , मशिदीवर भगवा झेंडा लावणे आदी गोष्टी चुकीच्या आहेत. देशात सांप्रदायिकता वाढवून दंगल घडवणे आणि सत्तेत राहणे हा त्याचाच प्रयत्न आहे असेही ते म्हणाले होते.

लोकसभेतील काँग्रेसचे खासदार प्रतोद सुरेश यांनी देखील पीएफआय आणि आणि संघ हे सारखेच असून संघ देखील देशात जातीयवाद पसरत आहे अशी टीका केली आहे. धर्म आणि कट्टरवादी कारवाया संपुष्टात आल्या पाहिजेत मात्र बंदीने हा प्रश्न सुटणार का असा प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केलेला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी बोलताना काही लोक संघावर बंदी घालण्याची मागणी करत आहे मात्र संघाने असा एक तरी प्रकार केलाय का जो पीएफआयने केलेला आहे. भारतात कायदा आहे संविधान आहे. कोणताही आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात. संघावर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या लोकांकडे अक्कलच कमी असल्याने मी त्यांच्याविषयी फार काही बोलणार नाही , असेही ते पुढे म्हणाले .