आपण नसताना बायको काय करते ? , बेडरूममध्ये पतीने सीसीटीव्ही लावले अन..

पती-पत्नीच्या नात्यात सर्वाधिक महत्त्वाचं काय असेल तर तो आहे विश्वास मात्र अनेकदा पती-पत्नीत किरकोळ कारणावरून एकदा अविश्वास निर्माण झाला तर काही केल्या मनात पुन्हा समोरील व्यक्तीबाबत विश्वासार्हता निर्माण होत नाही. अशीच एक घटना अमेरिकेमध्ये समोर आलेली असून आपल्या पत्नीच्या वर्तणुकीबद्दल संशय असल्याने एका पतीने चक्क बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते मात्र त्यामध्ये जे समोर आले ते दिसल्यानंतर पतीला खजील होण्याची वेळ आली.

आपली पत्नी गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला जवळ येऊ देत नाही जवळ गेले तर मी खूप थकलेली आहे असे सांगते मात्र प्रत्यक्षात तिचे कुठेतरी दुसरीकडे अफेयर सुरू असावे असा संशय या पतीला होता त्यातून त्याने आपली बायको घरी काय करते आपण गेल्यानंतर कोणासोबत वेळ घालवते म्हणून चक्क स्वतःच्या बेडरूम मध्ये त्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. बायकोला या प्रकाराचा काहीच अंदाज नव्हता त्यामुळे नेहमीप्रमाणे तिची दिनचर्या सुरू होती त्यानंतर नवऱ्याने एकेदिवशी सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज चेक केले त्यामध्ये जे समोर आले त्यानंतर त्याला स्वतः बद्दलच घृणा वाटू लागली.

नवऱ्याने बसवलेल्या असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रात्रभर तिची मुले तिला त्रास देऊन झोपू देत नव्हती त्यामुळे तिची रात्र झोप व्यवस्थित होत नव्हती. सकाळी देखील त्यांना शाळेत जायचे असल्याने बायकोला लवकर उठावे लागायचे त्यानंतर त्या वेळी हा पती झोपलेला असायचा त्यानंतर मुलांचा नाश्ता आंघोळ हे सर्व तिलाच करावे लागत असायचे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिला अवघे काही तास देखील स्वतःसाठी राहत नव्हते.

आपली बायको आपल्या संसारात किती गुरफटलेली आहे हे नवऱ्याला समजून आले आणि त्यानंतर त्याने तिची माफीही मागितली. आपण तिच्यावर उगाचच संशय व्यक्त करत होतो आणि बेडरूममध्ये कॅमेरे लावून घेतले असे त्याला वाटले. पतीने तिला ही गोष्ट सांगितली आणि तिची माफी मागितली. सदर दांपत्य ही लॉस एंजेलिस येथे राहत असून मेलानिया डार्लेन असे या महिलेचे नाव आहे.