कोरोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तीवर तब्बल सतरा महिने होते उपचार सुरु

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. इन्कम टॅक्स विभागातील अधिकारी असलेले विमलेश दीक्षित यांच्या मृतदेहांवर तब्बल 17 महिन्यांपर्यंत कुटुंबीय उपचार करत होते. 23 सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी अखेर या घटनेचा खुलासा झालेला असून मृतदेहावर उपचारासाठी आत्तापर्यंत या कुटुंबाने तब्बल तीस लाख रुपये खर्च केले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, विमलेश दीक्षित हे 2021 मध्ये मयत झाले होते मात्र दवाखान्यातून मयत घोषित करण्यात आल्यानंतर देखील त्यांच्या हृदयाचे ठोके चालू आहेत असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले नाही आणि घरातल्या घरात उपचार सुरू केले. चार दिवसात विमलेश यांना ऑक्सिजन देण्यासाठी या कुटुंबाने सुमारे नऊ लाख रुपये खर्च केले. कोरोना काळ सुरू असल्याने ऑक्सीजन सिलेंडरची मोठ्या प्रमाणात कमतरता होती मात्र तरीदेखील या कुटुंबाने तब्बल एक लाख रुपये देऊन ऑक्सिजन सिलेंडर खरेदी केलेला होता.

विमलेश यांच्या वडिलांनी म्हटले आहे की, 22 एप्रिल 2021 मध्ये आपल्या मुलाला मयत घोषित करण्यात आले होते त्यानंतर ते दीड महिन्यानंतर रुग्णालयात पोहोचले मात्र कोरोना संकट असल्याने त्यांना रुग्णालयात येऊ दिले नाही त्यानंतर एका खाजगी रुग्णालयात विमलेश यांना भरती करण्यात आले त्यानंतर या रुग्णालयाने त्यांच्याकडून मोठी रक्कम देखील वसूल केली मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आम्ही विमलेश यांना याला घरी घेऊन आलो.

घरी आणल्यानंतर पहिले सहा महिने एका बनावट डॉक्टरने विमलेश त्यांच्यावर घरी उपचार केले त्यामध्ये त्यांना ग्लुकोज देखील दिले जात होते. सहा महिने उपचार केल्यानंतर देखील अखेर विमलेश यांची नस सापडत नव्हती म्हणून या डॉक्टरने नकार दिला आणि त्यानंतर आम्हीच घरच्या घरी विमलेश यांच्यावर उपचार सुरू केले. सदर प्रकरण समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून तब्बल 17 महिन्यांपर्यंत एखादा मृतदेह सुस्थितीत कसा राहू शकतो याची देखील चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. मयत व्यक्तीवर उपचार करून या कुटुंबाची आत्तापर्यंत किती लुबाडणूक कोणी केली आहे याचादेखील आता शोध घेण्यात येणार आहे.

गेल्या सतरा महिन्यांपासून त्यांच्या मृतदेहावर घरगुती पद्धतीने त्यांचे कुटुंबीय उपचार करत होते. विमलेश आता जिवंत होतील फक्त तो कोमामध्ये गेलेला आहे असा त्यांचा विश्वास होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची पत्नी देखील उच्चशिक्षित असून ती एका बँकेत काम करते. कामावर जाण्यापूर्वी पतीच्या पायाला स्पर्श करून ती जायची आणि तिथून आल्यानंतर आपला पती जिवंत झालेला आहे का हेदेखील पाहायची. ती घरी नसताना विमलेशचे आई वडील त्याची काळजी घेत होते. डॉक्टरांनी देखील हे दुर्मिळ प्रकरण असल्याचे सांगितले असून सतरा महिन्यापर्यंत हा प्रकार सुरू असताना शेजार्‍यांना देखील काहीच कल्पना नव्हती असेही समोर आले आहे.


शेअर करा