काजलच्या खोलीत चित्रविचित्र आवाज येऊ लागले , पोलीस आले तेव्हा चक्क…

देशात एक खळबळजनक अशी घटना बिहारची राजधानी पाटणा येथे उघडकीला आली असून एका तरुणाला एका खोलीमध्ये तीन तरुणीसोबत पोलिसांनी पकडलेले आहे. एका खोलीत अनेक चित्रविचित्र आवाज येऊ लागल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र खोलीतील परिस्थिती पाहून पोलीसही चकित झाले.

उपलब्ध माहितीनुसार, पाटण्यातील शास्त्रीनगर पोलीस स्थानक क्षेत्रातील आश्रम गल्ली येथे एका तरुणासोबत वाढदिवसाच्या पार्टीत दारू पिणाऱ्या दोन तरुणींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. आरोपी तरुण हा या मुलींसोबत आक्षेपार्ह परिस्थितीत मद्यधुंद अवस्थेत आढळून आला होता त्यानंतर पोलिसांनी तिघांचीही तपासणी केली त्या वेळेस या तिघांनीही मद्यप्राशन केल्याचे समोर आले.

सदर खोलीत आणखी एक तरुणी देखील आढळून आली होती मात्र तिने दारू पिलेली नसल्याने तिला सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीसोबत सापडलेल्या दोन्ही मुली या सीतामढी येथील रहिवासी असून राजाबाजार येथे आश्रम गल्लीत भाड्याच्या खोलीत राहतात. शनिवारी रात्री काही जण दारूच्या नशेत गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडला असता त्यामध्ये तीन मुली आणि एक तरुण आढळून आला. त्याच्या तोंडातून दारुचा उग्र वास येत होता. अटक करण्यात आलेला तरुण हा सदर प्रकरणातील आणखी एक तरुणी काजल हिचा बॉयफ्रेंड असून याच खोलीमध्ये आणखी एक मुलगा देखील होता मात्र पोलिस येण्याच्या आधी त्याने पळ काढला आणि तीन तरुणींसह हा तरुण तिथे आढळून आला. फरार झालेला तरुण कोण आहे ? याचाही पोलीस सध्या शोध घेत आहेत.