पावसाळी अधिवेशन सुरु असताना भाजपचे आमदार काय करतात : पहा व्हिडीओ

प्रत्येक वेळी निवडणूक आल्यानंतर नागरिक मोठ्या उत्साहाने निवडणूकीत भाग घेतात आणि आपले लोकप्रतिनिधी निवडून देतात मात्र हे लोकप्रतिनिधी विधानसभेत पोहोचल्यानंतर कितपत गांभीर्याने काम करतात हा एक संशोधनाचा विषय आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून पावसाळी अधिवेशन सुरू असताना आमदार महाशय चक्क तीन पत्ती खेळण्यात व्यस्त होते तर इतरही आमदार मोबाईलवर गेम खेळत असताना दिसून आलेले आहेत . सत्ताधारी भाजपचे हे आमदार असून त्यांच्या या कृत्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे.

उत्तर प्रदेशचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना भाजपचे आमदार असलेले राकेश गोस्वामी हे मोबाईलवर तीन पत्ती खेळत असताना दिसून येत आहेत तर झाशी येथील आमदार रवी शर्मा हे तंबाखू मळताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही भाजपच्या रांगेत बसलेले होते आणि त्यांच्या पाठीमागे देखील भाजपचे आमदार होते त्यापैकी कुणीतरी हा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. भाजपमधील अंतर्गत स्पर्धा पुन्हा एकदा समोर आली असून समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे.

सदर दोन्ही व्हिडीओ समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेले असून हा व्हिडीओ भाजपच्या आमदाराने शूट केलेला आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे. सदर व्हिडिओनंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून भाजपच्या आमदारांनी अद्यापपर्यंत आपली कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.