महाराष्ट्र हादरला..शिक्षक व्यक्तीने विवाहित प्रेयसीसाठी केल्या क्रूरतेच्या मर्यादा पार

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून शिक्षक असलेल्या एका व्यक्तीने विवाहितेच्या प्रेमात चक्क तिच्या पतीचा खून केल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ही घटना असून एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने त्यांनी प्लॅन केला होता. विवाहित महिलेचा पती हा आजारी होता मात्र या महिलेच्या प्रेमात तो अडथळा ठरत होता म्हणून शिक्षक असलेल्या या पतीने चोरी करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला आणि त्याचा खून केला मात्र अखेर या प्रकरणाचा भांडाफोड करण्यात पोलिसांना यश आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरात ही घटना घडली असून मनोज रासेकर असे मयत पतीचे नाव आहे. मनोज यांच्या पत्नीचे स्वप्रिस गावंडे नावाच्या एका शिक्षकासोबत विवाहबाह्य संबंध होते. सतत आजारी असलेले मनोज यांना या प्रकरणाची कुणकुण लागली आणि त्यातून या पती-पत्नीत भांडणे सुरु झाली .

आपल्या प्रेमप्रकरणात पती आडवा येतो आहे. पतीचा अडथळा नको म्हणून पत्नीने प्रियकराला सोबत गेहटले आणि हत्येचा प्लॅन रचला. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे पत्नीने रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवला आणि त्यानंतर शिक्षक असलेला पती हा चोराच्या वेशभूषेत विवाहित प्रेयसीच्या घरात शिरला. त्याने विवाहितेच्या पतीच्या अर्थात मनोजच्या तोंडावर उशी दाबत त्याचा खून केला मात्र त्यावेळी आरडाओरडा झाल्याने दुसऱ्या खोलीत असलेली मनोज यांची आई ही देखील खोलीत घुसली त्यावेळी आपला प्लॅन फसला जाईल या भितीने शिक्षकाने चोरीचा बनाव केला आणि आईच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि दागिने घेऊन पलायन केले.

सकाळी ठरल्याप्रमाणे मनोजची पत्नी हिने पोलिसात जाऊन पतीचा खून केलेला आहे आणि आपल्या घरात लूटमार झालेली आहे अशी तक्रार पोलिसात दिली . पोलिसांनी सदर प्रकरणी तपास सुरू केला त्यावेळी मयत व्यक्ती मनोज यांची पत्नी ही एका फोन नंबरवर सतत संपर्क करत असल्याचे समोर आले त्यानंतर गुप्त सूत्रांच्या माध्यमातून तिच्या विवाहबाह्य संबंधाची देखील माहिती पोलिसांना समजली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आपला पती हा आजारपणातच मयत पावला असे तिला भासवायचे होते मात्र पोलिसांनी तिचा हा डाव हाणून पाडलेला आहे.


शेअर करा