नगर ब्रेकिंग..’ जित्याची खोड जाईना ‘ एकदा ग्रामस्थांनी सोडूवन देखील बदल नाही

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक खळबळजनक प्रकरण समोर आले असून पाथर्डी तालुक्यातील एका गावात एक अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत शेतात गवत काढत असताना तिच्याजवळ जाऊन छेड काढणाऱ्या एका तरुणाच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाथर्डी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीसोबत शेतामध्ये गवत काढत होती त्यावेळी तिथे आरोपी शहबाज पठाण ( राहणार तिसगाव ) हा आला आणि त्याने तिचा हात पकडून तिच्यासोबत लगट सुरू केली. घाबरून गेलेल्या मुलीने आरडा-ओरडा केला म्हणून तिची आजी तिथे धावून आली त्यावेळी आरोपीने तिथून पळ काढला तसेच तुझ्या घरच्या लोकांना काही सांगितलं तर त्यांना जाळून मारेल अशी देखील धमकी त्याने दिली.

मुलीच्या काकांनी देखील आरोपीला तिथून पळून जाताना पहिले असे मुलीने म्हटलेले असून शहबाज पठाण असे आरोपीचे नाव असल्याचे समजते. यापूर्वी देखील या तरुणाने इतर काही शालेय विद्यार्थिनीची छेड काढली होती त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली होती मात्र त्याची घरची परिस्थिती हलाखीची आहे म्हणून गावातील लोकांनी पुढाकार घेऊन त्याची सुटका केली होती मात्र त्यानंतर देखील त्याच्या वर्तणुकीत बदल घडला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला पोलिसांनी चांगला धडा शिकवावा जेणेकरून तो असे कृत्य पुन्हा करणार नाही अशी मागणी केली आहे.