सायबर कॅफेमध्ये ‘ आक्षेपार्ह ‘ प्रकार सुरु असतानाच पोलीस दाखल , जोडप्यांची पळापळ

सायबर कॅफेमध्ये इतरही अनेक गैरप्रकार होत असल्याच्या घटना देशभरात अनेक ठिकाणी समोर आलेल्या आहेत. प्रेमात पडलेली जोडपी लैंगिक चाळे करण्यासाठी सुरक्षित म्हणून सायबर कॅफेचा आधार घेत असल्याच्या घटना अनेक ठिकाणी उघडकीला आलेल्या आहेत. संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी पाच सायबर कॅफेवर पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई केली आणि त्यात तब्बल 34 जणांना ताब्यात घेण्यात आलेले होते. पोलीस पोहोचले त्यावेळी अनेक जोडपी आक्षेपार्ह परिस्थितीत आढळून आले.

संगमनेर शहर परिसरात ही कारवाई करण्यात आलेली असून पाच सायबर कॅफे मालक देखील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. संगमनेर येथे अनेक महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी शिक्षणासाठी येतात. प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर इतरत्र जाणे धोक्याचे ठरेल म्हणून आडोसा म्हणून या सायबर कॅफेचा आधार घेतला जातो. केवळ महाविद्यालयीन तरुण-तरुणी नव्हे तर शालेय विद्यार्थी देखील अशा ठिकाणी चुकीचे कृत्य करताना दिसून येतात. काही सायबर कॅफेमध्ये कंपार्टमेंट केलेले असून या कंपार्टमेंटमध्ये अनेक अनैतिक कृत्य देखील केले जातात. काही सायबर कॅफेत चक्क दारू गांजा देखील मिळत असल्याची चर्चा आहे.

भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने यासंदर्भात पोलिसांकडे कारवाईची मागणी करण्यात आली होती त्यानंतर पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी तातडीने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आणि 29 तारखेला तब्बल पाच सायबर कॅफेवर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे आढळून आलेल्या 34 जणांना सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर त्यांना समज देऊन त्यांची सुटका करण्यात आली.