ऑपरेशन केल्यावर पोटात निघाले 63 चमचे , व्यसनमुक्ती शिबिरात चक्क..

देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी डॉक्टरांनी तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून एका व्यक्तीच्या पोटातून तब्बल 63 चमचे काढलेले आहेत. एकाच व्यक्तीच्या पोटातून इतके सगळे चमचे निघाल्यानंतर डॉक्टर देखील हैराण झालेले होते.

उपलब्ध माहितीनुसार, विजयकुमार असे या रुग्णाचे नाव असून पोटात दुखत म्हणून तो रुग्णालयात दाखल झालेला होता. त्याचे वय 32 वर्षे असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. व्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींनी वर्षभर केंद्रात आम्हाला चमचे गिळायला लावले असा देखील धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.

डॉक्टर राकेश यांनी एक्स-रे मध्ये त्यांच्या पोटात काही वस्तू आम्हाला दिसून आल्या. त्याबाबत आम्ही त्याच्याकडे विचारणा केली त्यावेळी त्याने व्यसनमुक्ती केंद्रात आम्हाला हे चमचे खाण्यासाठी सक्ती करण्यात येत होती असे सांगितलेले आहे. सुमारे दोन तास आमचे ऑपरेशन चालले. अद्यापदेखील विजयकुमार हा आयसीयूमध्ये असून आत्तापर्यंत आपण असे ऑपरेशन कधीही केलेले नव्हते असे म्हटले आहे. विजयकुमार हा अद्यापपर्यंत बेशुद्ध असून तो शुद्धीवर आल्यानंतर पोलिस त्याचा जबाब नोंदविणार आहेत.