बोकडाचा बळी देण्यावर अखेर न्यायालयाचा निर्णय आला , दुर्घटनेनंतर बंद होती प्रथा

शेअर करा

नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या पायरीवर बोकडाचा बळी देण्याची बंद करण्यात आलेली प्रथा पुन्हा सुरू करण्यास न्यायालयाने परवानगी दिली असून या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.विजयादशमीच्या दिवशी बळी देण्यात येणार असलेल्या बोकडाची मिरवणूक काढण्यात येते आणि त्यानंतर त्याचा बळी देण्यात येतो.

11 सप्टेंबर 2016 रोजी दसऱ्याच्या दिवशी परंपरेनुसार मानवंदना म्हणून हवेत गोळी झाडण्याची प्रथा सुरूअसतानाच चुकून रायफलमधून गोळी भिंतीवरील दगडावर आपटली आणि त्यानंतर तिचे छर्रे ओढून 12 भाविक जखमी झाले होते त्यानंतर ही अमानुष प्रथा बंद करण्याची शिफारस पोलीस प्रशासनाने केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी सप्टेंबर 2017 पासून दसरा मिरवणूक टप्प्यातील गोळीबार आणि बोकड बळी देण्याच्या प्रथेवर बंदी घातली होती.

प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात आदिवासी विकास संस्था यांनी जुलै 2019 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. एडवोकेट दत्ता पवार यांनी याचिकाकर्त्याची बाजू न्यायालयासमोर मांडली आणि सप्तशृंगी गड तसेच परिसरातील ग्रामस्थांनी देखील ही प्रथा पुन्हा सुरू करावी यासाठी आक्रमक धोरण अवलंबले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर अखेर याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिलेला आहे.


शेअर करा