‘ यूपीएससीच्या परीक्षा नाही तर नागपूरची खाकी चड्डी घातली की .. ‘

शेअर करा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केलेला असून ‘ नागपूरचा गणवेश घातला की स्पर्धा परीक्षा देण्याची गरज पडत नाही . संघाचा गणवेश घातल्यावर तो व्यक्ती डायरेक्ट जॉइंट सेक्रेटरी होतो ‘, अशा शब्दात आरएसएसला खडसावले आहे . बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

नाना पटोले म्हणाले की, ‘ सध्या देशाची व्यवस्था संपवण्याचे काम सुरू आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ संपविण्याचे काम देशात सध्या सुरू असून सुप्रीम कोर्टाचे जज देखील माध्यमांसमोर येऊन आम्हाला वाचवा असे म्हणतात. सुप्रीम कोर्टाचे जज यांच्यावर जर ही वेळ आली असेल तर न्याय व्यवस्था देखील धोक्यात आलेली आहे. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कलेक्टर व्हायचे असेल, एसपी व्हायचे असेल तर तुम्हाला युपीएससीच्या परीक्षा पास करायला कराव्या लागायच्या. आता त्या यूपीएससीच्या परीक्षा नाही तर नागपूरची चड्डी ज्यांनी घातली असेल तो डायरेक्ट जॉइंट सेक्रेटरी होतो, ‘ असेदेखील नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांच्या बोचऱ्या टीकेनंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले असून, ‘ संघाच्या हाफ पॅन्टचे इतकेच कौतुक असेल तर नाना पटोले यांनी एकदा संघाच्या शाखेत जावे. तिथे गेल्यानंतर नाना पटोले यांना देशप्रेम काय असते हे कळेल. समर्पित भाव काय असतो अन देशासाठी कसं जगायचं असतं हे देखील त्यांना कळेल ‘, असेदेखील ते म्हणाले.


शेअर करा