राहुल गांधींच्या ‘ ह्या ‘ व्हिडिओने वार फिरलंय , भाजपची उलटी गिनती सुरु ?

शेअर करा

देशभरात भारत जोडो यात्रेला उदंड असा प्रतिसाद लाभत असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा भाजप सत्तेत असलेल्या कर्नाटक राज्यात दाखल झालेली आहे. राहुल गांधी यांनी रविवारी प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिरात दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांनी म्हैसूर इथे एका मैदानावर भाषण केले. त्यांचे भाषण सुरू असतानाच धो-धो पाऊस सुरू झाला मात्र तरीही नागरिक तिथून हलले नाहीत. राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी नागरिक पावसात उभे पाहिल्यानंतर राहुल गांधी यांनी देखील भर पावसात भाषण केलेले असून भाजप आणि आरएसएसची चांगलीच धुलाई केली आहे. भर पावसातील राहुल गांधी यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राहुल गांधी यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते भरपावसात जनसमुदायाला संबोधित करताना दिसत असून भारत जोडो यात्रा आता कर्नाटकमध्ये पोहोचलेली आहे . एखाद्या नदीप्रमाणे ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणार आहे. या नदीमध्ये आपल्याला हिंसा द्वेष दिसणार नाही तर केवळ प्रेम आणि बंधुभाव दिसेल. भारत जोडो यात्रा आता थांबणार नाही. आता बघा पाऊस येत आहे मात्र पावसाने देखील यात्रा रोखली नाही आणि वादळ देखील रोखणार नाही. भारत जोडो यात्रेचा उद्देश भाजप आणि आरएसएस देशात जे द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत त्यांच्या विरोधात उभे राहण्याचा आहे , ‘ असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केलेला असून व्हिडिओ सोबत, ‘ भारत को एकजुट करने से, हमें कोई नहीं रोक सकता। भारत की आवाज़ उठाने से, हमें कोई नहीं रोक सकता। कन्याकुमारी से कश्मीर तक जाएगी, भारत जोड़ो यात्रा को कोई नहीं रोक सकता। ‘, असे म्हटलेले आहे . राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे मात्र गोदी मीडियाला अद्यापही रस्त्यावरील यात्रा दिसलेली नाही.


शेअर करा