‘ आता कोणी जंगलराज म्हणणार नाही ‘, मुलीचा विवस्त्र मृतदेह घेऊन पळताना पोलीस : व्हिडीओ

शेअर करा

एक खळबळजनक अशी घटना उत्तर प्रदेशात औरिया येथे समोर आलेली अजून एका 17 वर्षीय मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळून आलेला आहे . काँग्रेसने हा व्हिडिओ ट्विट केलेला असून त्यामध्ये आता कुणी जंगल राज म्हणणार नाही अशी देखील खरमरीत टीका केली आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात प्रत्येक अप्रिय घटनेबद्दल ‘ जंगलराज ‘ असा शब्द प्रयोग करून गोदी मीडियाकडून तेथील सरकारला धारेवर धरण्यात येते यावर काँग्रेसने हल्लाबोल केलेला आहे.

सदर घटनेचा व्हिडीओ काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केलेला असून या व्हिडिओमध्ये सुमारे दहा ते पंधरा पोलीस कर्मचारी खांद्यावर एक तिरडी घेऊन त्यावर एका 17 वर्षीय मुलीचा मृतदेह घेऊन जात असताना दिसत आहेत. अत्यंत विचलित करणारा हा व्हिडिओ असून यावेळी काँग्रेसने या व्हिडिओ बद्दल उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला प्रश्न केलेला आहे सोबतच गोदी मीडिया देखील काँग्रेसच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे.


शेअर करा