वहिनीला दिराबरोबर रंगेहाथ धरल्यानंतर गावकऱ्यांनी लग्न लावले मात्र पुन्हा पतीकडे गेल्यावर ?

  • by

गावातील लोकांनी त्या महिलेला दीरासोबत विचित्र अवस्थेत पाहिल्याने प्रकरणाचा भंडाफोड झाला मात्र त्यानंतर सगळे गावकरी एकत्र आले आणि त्यांनी त्या महिलेचे दीरासोबतच पुन्हा लग्न लावून दिले. ही खळबळजनक घटना बिहारमध्ये घडलेली असून वहिनीचे दिराबरोबर प्रेम संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांच्या समोर त्या दोघांचे लग्न लावून त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बिहारमधील तिसिऔता पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिर आणि वहिनीला गावकऱ्यांनी विचित्र अवस्थेत पाहिले. ते पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी त्या तरुणाला मारहाण करत पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावरच गावकरी थांबले नाही. त्यांनी दिराचे आणि वहिनीचे सर्व नागरिकांच्या समोर लग्न लावून दिले. त्यानंतर त्यांची रवानगी तिसिऔता पोलीस ठाण्यात केली आणि मात्र पोलिसांनी देखील कोणताही गुन्हा दाखल न करता त्या दोघांना सोडून दिले.

ज्या महिलेने आपल्या दिरासोबत लग्न केले होते. त्या महिलेला दोन मुले असून ती लग्न करुन नंतर आपल्या पतीच्या घरी गेली. मात्र, पतीने देखील तिला नकार देऊन ज्या व्यक्तीसोबत आता तुझे लग्न लावून दिले आहे, त्याच्यासोबतच रहा, असे सांगून तिला नांदवण्यास नकार दिला.

दरम्यान, एसएचओ ने दिलेल्या माहितीनुसार; पोलिसांनी दोघांना घेऊन पोलीस ठाणे गाठले खरे मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तर याप्रकरणी संपूर्ण जबाबदारी ग्वाही कांगारू कोर्टावर सोपवण्यात आली आहे.