मोहटादेवीचे तब्बल ‘ इतक्या ‘ माताभगिनींनी घेतले दर्शन , निलेश लंके म्हणतात..

शेअर करा

नवरात्र उत्सवात गेल्या पाच वर्षापासून मतदार संघातील महिलांना मोहटा दर्शनासाठी घेऊन जाणे आणि परत सुखरूपरित्या त्यांना घरी पोचवणे हे आपण केवळ राजकारणासाठी करत नाही तर एक कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. या सर्व योजना पारनेर आणि नगर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचे काटेकोर नियोजन असल्यानेच पार पडत आहे. कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे, असे पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी म्हटलेले आहे.

नगर तालुक्यातील चांदबिबी महालाच्या पायथ्याशी असलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. निलेश लंके म्हणाले की नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून आठव्या माळेपर्यंत आत्तापर्यंत सुमारे एक लाख 26 हजार महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवण्याची जबाबदारी माझ्यासह कार्यकर्त्यांनी पार पडलेली आहे. आम्हाला ही ताकद तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे. आज मुले आपल्या माता-पित्यांना देवदर्शनासाठी घेऊन जाण्याचा कंटाळा करतात म्हणून तुमचा मुलगा म्हणून मी ही सेवा करत आहे , असेही ते पुढे म्हणाले.

निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी नवरात्रात खेड्यापाड्यातील माता-भगिनींना मोहटादेवीचे दर्शन घडवण्याची जबाबदारी प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षापासून पार पाडत आहे. कोरोना काळातदेखील आमदार निलेश लंके यांनी कोव्हीड सेंटर चालवले होते त्याची देखील जोरदार चर्चा झाली होती त्यानंतर यंदा निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे तीनशे बसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये प्रवास करणाऱ्या माता-भगिनींना फराळाची देखील व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती. निलेश लंके यांच्या समाज उपयोगी कार्याचे पूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.


शेअर करा