‘ बिबट्या ‘ प्रश्नावर प्राजक्तदादांचे खासदारांना आवाहन , म्हणाले ‘ चित्ते जसे आणले.. ‘

शेअर करा

नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा उपद्रव वाढलेला असून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी आणि पशुधन हानी होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने बिबट्याच्या संरक्षण कायद्यात बदल करण्याची मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलेली आहे. केंद्र सरकारने परदेशातून जसे चित्ते आणलेत तसेच परदेशात बिबटे पाठवावे यासाठी खासदारांनी संसदेत प्रयत्न करण्याचे आवाहन प्राजक्त तनपुरे यांनी केलेले आहे.

नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा उपद्रव वाढला असून शेतकरी भीतीच्या वातावरणात जगत आहेत. बिबट्यांचा मुक्त संचार वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरलेली असून त्याच्या भीतीने रात्री-अपरात्री सुटत असलेले पाणी शेताला देण्यास देखील शेतकरी धजावत नाहीत. बिबट्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी आणि पशुधन हानी होऊ लागल्यानंतर त्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही खासदार यांनी केंद्र सरकारला बिबट्याच्या संरक्षण कायद्यात बदल करण्याची मागणी करावी, असे देखील प्राजक्त तनपुरे म्हणाले.


शेअर करा