‘ पंतप्रधान मोदी यांना मी दारुड्या म्हणणार नाही पण .. ‘, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेअर करा

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली असून ‘ राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा दाखवण्याचे मोठेपण बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे नाही ‘, असे म्हटले आहे. अकोला येथे त्यांनी भर पावसात सभा घेतलेली होती त्या वेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा झाला होता त्या वेळी बोलताना त्यांनी म्हटले की, ‘ देवेंद्र फडणवीस यांचे डी मोशन झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर ते उद्या अकोल्यात येत आहेत. भारताची अर्थव्यवस्था दारुड्यासारखी झालेली आहे. दारुड्या जसा एक एक सामान विकतो तसा देशाचा कारभार सध्या सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांना मी दारुड्या म्हणणार नाही मात्र त्यांची वागणूक तशीच आहे , ‘ असेही ते पुढे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, ‘ सर्वच ग्रामपंचायत निवडणुका वंचित लढणार असून कार्यकर्त्यांनी या निवडणुका पुरेपूर ताकतीने लढवायच्या आहेत. अरेला कारे करण्याची तयारी ठेवा ‘, असेदेखील आवाहन त्यांनी केलेले असून जे आमच्यावर बी टीम असल्याचा आरोप करत होते ते आज आमच्या सोबत बसण्याच्या गप्पा करत आहेत असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा