‘ मित्रांना ६ टक्के व्याजाने कर्ज अन अन्नदात्याला २४ टक्के अन..’, राहुल गांधींकडून हल्लाबोल

शेअर करा

राहुल गांधी यांच्या भारत यात्रेला देशात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. सध्या भारत जोडो यात्रा ही भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात असून काही माथेफिरूच्या हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहीण या देखील या यात्रेत सहभागी झालेल्या आहेत. राहुल गांधी यांनी या यात्रेचे फोटो शेअर केलेले असून यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या मातोश्रीचा हात हातात घेऊन यात्रेत चालताना दिसत आहे.

गौरी लंकेश यांचे कुटुंबीय भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तेव्हा राहुल गांधी देखील भावूक झालेले पाहायला मिळाले त्यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलेले असून ‘ गौरी सत्याच्या बाजूने उभी राहिली. गौरी हिम्मत करून उभी राहिली. गौरी स्वातंत्र्यासाठी उभी राहिली. मी गौरी लंकेश आणि त्यांच्यासारख्या असंख्य लोकांसाठी उभा आहे जे भारताच्या खऱ्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. भारत जोडो यात्रा हा त्यांचा आवाज आहे आणि तो कधीच शांत करता येणार नाही’, असेदेखील त्यांनी राहुल गांधींनी म्हटले आहे.

काँग्रेसने देखील त्यांच्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केलेला असून दिवंगत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांचे कुटुंबीय भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत आले होते. गौरी लंकेश यांचा धाडसी आणि निर्भीड आवाज द्वेष आणि हिंसाचाराच्या प्रतिनिधींनी दाबलेला होता. देशात पसरलेल्या द्वेषाच्या विरोधात ही यात्रा सुरू असून आता आम्ही घाबरणार नाही झुकणार नाही आणि थांबणार नाही असेही म्हटले आहे. गौरी लंकेश यांची काही माथेफिरूंनी 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या केली होती. आपल्या निर्भीड लिखाणासाठी परिचित असलेल्या गौरी लंकेश यांच्या लिखाणानंतर या माथेफिरुची माथी भडकली होती आणि त्यातूनच त्यांनी हे कृत्य केले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, ‘ दोन भारत या देशात मान्य नाहीत. काल मी एका महिलेला भेटलो तिच्या शेतकरी पतीने पन्नास हजार रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या केली. एक भारत हा की भांडवलदार मित्रांना फक्त सहा टक्के व्याजाने कर्ज आणि कोटींची कर्जमाफी तर दुसरा भारत म्हणजे शेतकऱ्यांना 24 टक्के व्याजाने कर्ज आणि संकटांनी भरलेले जीवन ‘, असे म्हटले आहे.


शेअर करा