शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना उघडकीला आली असून लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर बलात्कार केल्यानंतर त्यातून ती गर्भवती झाली त्यानंतर आरोपीने ‘ तू अनुसूचित जातीतील आहेस ‘ असे सांगून तिला लग्नाला नकार दिला तसेच पोलिसात गेली तर तुझी छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करेल असे देखील धमकी दिली. सदर प्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मिलिंद बाळासाहेब भोईटे ( वय 33 राहणार पवार वाडी तालुका श्रीगोंदा अहमदनगर ) असे या आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत रवीना कांबळे नावाच्या एका महिलेच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हडपसर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला असून तक्रारीत म्हटल्याप्रमाणे आरोपी मिलिंद याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर वेळोवेळी विविध ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले. ती गर्भवती झाल्यानंतर मिलिंद त्याने तिला धमकावत गर्भपाताच्या गोळ्या देखील खाऊ घातल्या आणि तिचा गर्भपातही केला.
आरोपी मिलिंद मोहिते याने या तरुणीसोबत आपले काही फोटो काढले होते त्यानंतर त्याने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची देखील धमकी दिली आणि ही छायाचित्रे रवीना कांबळे नावाच्या एका महिलेला देखील पाठवली त्यातून देखील आपली बदनामी झाली असे पीडित तरुणीचे म्हणणे आहे. तरुणीने त्याला लग्नासाठी विचारणा केली त्यावेळी त्यांनी जातीचे कारण देत त्याच्या लग्नाला नकार दिला. आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर तिने चतुर्श्रुंगी पोलिसात गुन्हा दाखल केला .