लष्करी अधिकारी सांगून थकले पण महिला पोलवरून उतरेनाच मात्र अखेर..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून जयपूर येथील हे प्रकरण आहे. हरियाणा येथील एक महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जयपूरला गेली होती त्यावेळी त्या महिलेने लष्करी अधिकाऱ्यांच्या समोरच चांगलाच गोंधळ घातला. सदर महिला ही एका लष्कराच्या जवानाबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होती. त्याला भेटल्यानंतर तिने विजेच्या खांबावर चढून बराच गोंधळ घातला.

लष्करातील अधिकाऱ्यांनी तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र ती कुणाचे ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हती त्यामुळे नंतर पोलिसांना बोलावण्यात आले . तब्बल वीस मिनिटे ही महिला पोलिसांसोबत गोंधळ घालत होती. अखेर या महिलेला पोलवरून उतरवण्यात पोलिसांना यश आले आणि प्रकरणावर पडदा पडला.

लष्करी अधिकार्‍यांनी समजूत घालूनही या महिलेच्या वर्तणुकीत बदल झाला नाही आणि ती उतरण्याचे नाव घेत नव्हती मात्र पोलीस आल्यानंतर तिने खाली उतरण्यास होकार दिला. सदर महिला ही हरियाणा येथील रहिवासी असून बऱ्याच वर्षांपासून ही एका जवानाच्या लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होती. पोलिसांनी तिला अटक केली असून त्याची चौकशी केली त्यानंतर जवानाच्या विरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सुरेंद्र असे या जवानाचे नाव असून लष्करी अधिकाऱ्यांनी या महिलेला जवानाला भेटण्याची परवानगी दिली होती त्यानंतर ती आतमध्ये जाऊन जवानाला भेटली आणि ज्यावेळी ती बाहेर आली त्यावेळी ती चिडलेल्या अवस्थेत होती त्यातून तिने शिवीगाळ केली आणि पोलवरून चढून जीव देण्याची भाषा करू लागली. सदर प्रकरणी पोलिस तपास सुरू असल्याचे समजते


शेअर करा