पॉक्सोचा आरोपी पारनेर पोलिसांना सहा महिन्यांपासून ‘ भेटेनाच ‘, काय आहे प्रकरण ?

शेअर करा

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एप्रिल महिन्यात एक खळबळजनक अशी घटना उघडकीला आली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रकार ढवळपुरी येथे उघडकीला आला होता.. सदर प्रकरणी आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला मात्र सुमारे सहा महिने उलटत आले तरी देखील हा आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पीडित परिवाराने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या माध्यमातून या संदर्भात पाठपुरावा केला मात्र तरीही पारनेर पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने दहा तारखेला नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

काय आहे प्रकरण ?

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरातून इयत्ता दहावीच्या पेपरसाठी गेलेल्या मुलीचे आरोपी शरद बबन ढेकळे,दीपक धुळाजी बरकडे, सागर रोडीबा करगळ व सागर बरकडे यांनी फूस लावून अपहरण केले होते आणि त्यानंतर पीडित मुलीवर अत्याचार करण्यात आला. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर देखील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही मात्र अखेर पीडित मुलीने या संदर्भात वडिलांना फोन करून माहिती दिली.

पीडित मुलीचा मोबाईल हा देखील अद्याप आरोपींकडे असून आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल करून घेतलेला आहे मात्र आरोपीला शोधण्यासाठी पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केलेला असून पारनेर पोलिस ठाण्यात या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. आरोपीने मुलीच्या घरासमोर येऊन हॉर्न वाजवत शिव्या देऊन दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला. पीडित कुटुंबाने यासंदर्भात आरोपी गावात आलेला आहे अशी देखील माहिती दिली मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे.

कुटुंबाच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी कुठे आहे हे त्याच्या भावाला माहिती असून तो सतत त्याच्या संपर्कात आहे आणि पीडित कुटुंबावर आरोपी वेगवेगळ्या माध्यमातून दहशत निर्माण करत आहेत तर पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत आहे त्यामुळे अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या माध्यमातून दहा तारखेपासून नगरच्या जिल्हा नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी परिवाराची मागणी असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे .

अन्याय निर्मूलन सेवा समितीचे अरुण रोडे यांनी सदर प्रकरणी संताप व्यक्त केलेला आहे. दुसर्‍या एका प्रकरणात माजी सरपंच उज्वला धनवे यांनी त्यांचे पती असलेले बाळासाहेब धनवे यांच्या संदर्भात तक्रार केल्यानंतर माजी सरपंच उज्वला धनवे यांनी ‘ बाळासाहेब धनवे यांना अरुण रोडे यांनी जातीवाचक शिवीगाळ केली आणि खंडणीची मागणी केली ‘ अशी तक्रार पोलिसात दाखल केली आहे. अरुण रोडे यांनी जातीवाचक बोललो आणि खंडणी मागितली याचे पुरावे असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा आणि पुरावे नसतील तर माझी आणि आमच्या कार्यकर्त्यांची बदनामी केल्याप्रकरणी उज्वला धनवे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. माजी सरपंच उज्वला धनवे यांनी आपल्या पतीचा गैरकारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून खोटी तक्रार केलेली आहे असे देखील त्यांनी सांगितले .


शेअर करा