नगरसेविकेच्या पतीवर जमावाचा हल्ला , अनैतिक संबंधातून ठेचून हत्या

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना उघडकीला आली असून झारखंड येथे बोकारो जिल्ह्यात धैयान या गावात जमावाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. संतप्त गावकऱ्यांनी रंगेहाथ एका महिलेसोबत त्याला पकडले आणि त्यानंतर त्याला जोरदार मारहाण केली . मयत व्यक्तीचे नाव 47 वर्ष असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, इम्रान अन्सारी असे या व्यक्तीचे नाव असून तो मनरेगा योजनेसाठी लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होता. त्याला चार मुले असून त्याची पत्नी देखील नगरसेविका आहे. असे असताना त्याचे परिसरातील एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध जुळले होते. दुर्गा माता विसर्जन मिरवणूक निघाली निघाली होती त्यावेळी काही जणांनी त्याला शाळेच्या मागे एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना पाहिले त्यानंतर संतप्त जमावाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत .


शेअर करा