नगर ब्रेकिंग..’ त्या ‘ दोघांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यासाठी मोर्चा

शेअर करा

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून निंब्राळ येथील अमोल कैलास वाकचौरे आत्महत्याप्रकरणी त्याची पत्नी सासू आणि मेहुणा यांना आठ दिवसांपूर्वी अटक झाली मात्र मुख्य आरोपी असलेला योगेश गोसावी ( राहणार नांदगाव ) याला अटक करण्यात आलेली नाही. या चौथ्या आरोपीला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी जोर धरत असून गावातील गावकरी आणि अमोल यांचे मित्र आणि नातेवाईक यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यावर यासंदर्भात मोर्चा काढलेला होता. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी या मोर्चात सहभागी होऊन निषेध नोंदवला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केलेले आहे.

अमोल वाकचौरे यांनी ऑक्टोबर महिन्यात आत्महत्या केलेली होती. सदर प्रकरणी पोलिसांनी अमोल याची पत्नी करुणा वाकचौरे, सासु प्रतिभा सोनवणे, मेहुणा संकेत सोनवणे यांना अटक केलेली असून प्रकरणातील मुख्य असलेला आरोपी योगेश गोसावी ( नांदगाव जिल्हा नाशिक ) याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

धक्कादायक बाब म्हणजे पत्नी करुणा ही पोलिसात कार्यरत असून योगेश गोसावी हा देखील सैन्यात काम करतो. या दोघांनाही सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केलेली असून गावकऱ्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी या मोर्चाला समोर जाऊन आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले असून कारवाईचे आश्वासन दिले आहे.


शेअर करा