नगरच्या रस्त्यांची भयावह परिस्थिती , महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा

नगर शहरात रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली असून शहरातील नागरिकांच्या पाठीचे दुखणी वाढलेली आहेत. शहरातून दुचाकी चालवणे अवघड झाले असून रिक्षा आणि चारचाकी वाहनाबद्दल तर बोलायची देखील सोय राहिलेली नाही. शहरातील जीवघेणे खड्डे बुजविण्यात यावेत या खड्ड्यांमुळे रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून रिक्षा दुरुस्तीसाठी येणारा खर्च हा देखील मोठ्या प्रमाणात आहे. छोटे खड्डे खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात देखील होतात त्यामुळे रिक्षाचालकांनी महापालिकेला रिक्षा घेराव घालण्याचा इशारा दिलेला असून सुस्तावलेल्या महापालिकेला यानिमित्ताने तरी जाग येईल अशी अपेक्षा नगरकर व्यक्त करत आहेत

नगर शहरातील मान्यताप्राप्त असलेल्या ऑटो रिक्षा थांब्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली असून हातगाडीवाले, भाजीवाले यांनी या जागा बळकावल्या आहेत.त्यांची रिक्षा थांब्यावर असलेली अतिक्रमणे काढावीत तसेच रिक्षा स्टॅण्डवर घाणीचे मोठे साम्राज्य झालेले असून त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावी. खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्ते निदान वाहन चालवणे इतपत तरी करण्यात यावे. सर्व बस स्टॉपवरील पथदिवे चालू करावेत. रिक्षा स्टॉपवर पांढरे पट्टे मारून रिक्षा जिथे थांबतात त्या ठिकाणी आखणी करून द्यावी अशी देखील मागणी ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे .