‘ काका मला वाचवा ‘ च्या किंकाळ्या पुन्हा पुण्यात घुमल्या , बसमध्ये नक्की काय घडलं

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झालेला असून पुणे येथील पिंपरी परिसरातील हा व्हिडिओ आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एका बसमधील हा व्हिडीओ असून एक प्रवासी ‘ मला वाचवा मला वाचवा हा ड्रायव्हर माझे मला किडनॅप करत आहे ‘ असे सांगत ‘ मला बसमधून उतरून देत नाही. मला माझ्या ऑफिस समोर सोडा ‘ , असे जोरजोराने ओरडत आहे. चालकाच्या केबिनच्या बाजूला उभा राहून त्याचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. चिंचवड मार्गे धावणाऱ्या पीएमपीएमएल बसमधील हा व्हिडिओ आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवारी 14 तारखेला सकाळी ही बस चिंचवडवरून बालेवाडीकडे जात होत. सदर बस ही अधिकृत थांब्यावर थांबते मात्र या तरुणाने मध्येच बस थांबवून चालकाला दरवाजा उघडण्यास सांगितले होते त्यावेळी त्याने अशी अचानक मध्येच बस थांबवता येणार नाही असे उत्तर दिल्याने या तरुणाने चालकास समोरील विविध बटने दाबून दरवाजा उघडण्याची विनंती केली मात्र ऐकत नसल्याने त्याने काका मला वाचवा असा आरडाओरडा बसमध्ये सुरू केला . त्याचा आरडाओरडा पाहून प्रवाशांना देखील हसू येत होते.

सदर तरुणाने चिडून त्यानंतर बसचा डॅशबोर्ड वाजवण्यास सुरुवात केली त्यावेळी काही प्रवाशांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला मात्र तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बसमधील त्याचे हावभाव व बाहेरील प्रवाशांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यानंतर बसच्या समोर दुचाकीचालक आणि नागरिकांची देखील चांगलीच गर्दी जमा झाली. मला माझ्या ऑफिसजवळ सोडवून द्या असे म्हणत या तरुणाने चांगलाच राडा केलेला असून चालकाने मात्र बस थांबवली नाही आणि त्यानंतर अधिकृत बस थांबा असलेल्या ठिकाणी त्याला उतरवून दिले . सोशल मीडियावर या तरुणाची सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली असून त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिक वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया देत आहेत.


शेअर करा