सहा दिवसांपूर्वी ‘ सिलिंग फॅन ‘ चे रील्स अन.., सुसाईड नोटमध्ये असे काही समोर

शेअर करा

देशात एक खळबळजनक घटना मध्य प्रदेशात समोर आलेली असून इंदोर येथील टेलिव्हिजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने आत्महत्या केलेले आहे. वैशाली ठक्कर असे या अभिनेत्रीचे नाव असून तिच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाईड देखील आढळून आलेली आहे. तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडचा उल्लेख केलेला असून तो आपल्याला त्रास देत होता असे म्हटले होते मात्र या चिठ्ठीमध्ये आणखी दोन व्यक्तींची नावे देखील असल्याचे समोर आले आहे.

मध्यप्रदेशातील इंदूर येथे अभिनेत्री असलेली वैशाली ठक्कर हिने साईबाबा कॉलनीत रविवारी आत्महत्या केलेली होती. घरातील फॅनला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. तिच्या डायरीमध्ये सुसाईड नोट आढळून आलेली असून त्यामध्ये तिने आई-वडिलांची माफी मागितली असून मी एक चांगली मुलगी होऊ शकले नाही मला माफ करा असे देखील तिने आई वडीलांना म्हटलेले आहे.

वैशालीने तिच्या सुसाईड नोटमध्ये राहुल नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केलेला असून हा व्यक्ती तिचा शेजारी असल्याची देखील चर्चा आहे. त्यात तिने राहुल आणि त्याची पत्नी दिशा यांनी आपल्याला अडीच महिने मानसिक त्रास दिला असे म्हटले आहे. त्या दोघांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची देखील तिने विनंती केली आहे.

सुसाईड नोटमध्ये तिने वैशाली हिने ‘ राहुल आणि त्याच्या पत्नीला कठोरात कठोर शिक्षा मिळवून द्या नाहीतर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही ‘ असे देखील तिने म्हटले आहे. सोशल मीडियावर देखील वैशाली मोठ्या प्रमाणात कार्यरत होती. आत्महत्या करण्यापूर्वी सहा दिवसांआधी तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला होता त्यामध्ये तिने फक्त सिलिंग फॅन दाखवलेला होता यावरून तिने आधी आत्महत्येचे संकेत देखील दिले होते अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे.


शेअर करा