‘..तेच आता शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडत आहेत ‘, प्राजक्तदादांनी ठणकावलं

माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारवर टीका केलेली असून ‘ सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी, वीज आणि रस्ते यापलीकडे कुठलीही अपेक्षा नाही मात्र शेतकऱ्यांच्या या मूलभूत गरजा पुरविण्यात देखील राज्य सरकार अपयशी ठरत आहे. आपण सत्तेत असताना ज्या व्यक्तींनी वीज बिले भरू नका असे आवाहन केले होते तेच आता शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडत आहेत ‘, अशी टीका केली आहे.

पाथर्डी तालुक्यातील एका तलावाच्या जलपूजनप्रसंगी बोलत असताना प्राजक्त तनपुरे म्हणाले की, ‘ माझ्याकडे ऊर्जा खाते असताना वेळेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मी दखल घेत होतो त्यावेळी शेतकऱ्यांना वीज बिल भरू नका असे आवाहन करणारे आता मात्र शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन तोडण्याचे आदेश देत आहेत . तालुक्याच्या अनेक भागात पाणी आहे तर वीज नाही आणि अनेक ठिकाणी वीज रोहित्र जळण्याची देखील शेतकरी तक्रार करत आहे मात्र त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, ‘ अशी देखील खंत प्राजक्त दादा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.