ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची दयनीय परिस्थिती, केंद्राने पुन्हा जबाबदारी झटकली

शेअर करा

केंद्र सरकारच्या दाव्यांची ग्लोबल हंगर इंडेक्स यांनी चांगलीच पोल-खोल केलेली असून एकीकडे 5 ट्रिलियन इकॉनोमीची स्वप्न केंद्र सरकार लोकांना दाखवत आहे मात्र प्रत्यक्षात नागरिकांची बिकट परिस्थिती दिसून येत आहे. महागाई आणि बेरोजगारी यांनी जनतेचे कंबरडे मोडले असून जागतिक ग्लोबल हंगर इंडेक्सची यादी केंद्र सरकारच्या चिंतेत भर घालणारी आहे मात्र नेहमीप्रमाणे केंद्र सरकारने राष्ट्रवादाच्या आड लपण्याचे काम केले असून हा भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे अशा स्वरुपात वस्तुस्थिती स्वीकारण्यास देखील नकार दिलेला आहे.

ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 मध्ये भारताची सहाव्या स्थानी घसरण झालेली असून 121 देशांच्या यादीत भारत आता 107 नंबर वर पोहोचलेला आहे. दक्षिण आशियात अफगाणिस्तान वगळता इतर सर्व देश भारताच्या पुढे आहेत. भीषण पूरपरिस्थितीने त्रासलेला पाकिस्तानदेखील आणि आर्थिक अडचणीत असलेला श्रीलंका देखील भारताच्या पुढे असून बांगलादेश, नेपाळ, म्यानमार यांनादेखील भारतापेक्षा चांगले रँकिंग मिळाले आहे. भारत आता झांबिया लायबेरिया कोंगो देशाच्या पंगतीत आलेला आहे.

सदर यादी समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ला चढवलेला असून काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या आठ वर्षाच्या कार्यकाळात भारताची घसरण झालेली आहे असे म्हटलेले आहे तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याच्या गोष्टी सुरू आहेत आणि 106 देश आपल्यापेक्षाही चांगल्या परिस्थितीत आहे अशा शब्दात निशाणा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

देशातील अन्नधान्याची कमी. मुलांचे पोषण आणि बालमृत्यू या गोष्टीचा यासाठी विचार केला जातो आणि त्यानंतर हा अहवाल तयार केला जातो. भारतातील दयनीय स्थिती इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इतर माध्यमांना दिसत नसली तरी जागतिक पातळीवर मात्र केंद्र सरकारच्या दाव्यांची चांगलीच पोल-खोल होत असून नेहमीप्रमाणे सरकार राष्ट्रवादाच्या आड लपून आपल्या चुका झाकण्याचे काम करत आहे.


शेअर करा