अंधेरी पूर्वमधून माघार म्हणजे भाजपच्या स्क्रिप्टचा भाग , संजय राऊत म्हणाले की..

शेअर करा

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत सुरुवातीला एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती मात्र अखेरीस भाजपने मुरजी पटेल यांना निवडणुकीत उतरवले आणि त्यानंतर रहस्यमयरित्या उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात घोषणा केली आणि ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला मात्र यामुळे या सर्व प्रकरणात राज ठाकरे यांचे नाव आल्यानंतर पटेल यांच्या समर्थकांनी मनसेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपला एक पत्र लिहिले होते त्यानंतर त्यांच्या या पत्राचा आम्ही विचार केला आणि संवेदनशीलतेचे भावन ठेवत अर्ज परत घेतला असे भाजपकडून सांगण्यात आले मात्र राज ठाकरे आणि भाजपच्या विरोधात मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांच्यामुळे आम्हाला निवडणुकीतून माघार घ्यावी लागली असे देखील त्यांचे म्हणणे असून त्यांनी चक्क राज ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.

मुरजी पटेल यांनी या प्रकरणी बोलताना ,’ मला भाजपने उमेदवारी दिली होती मात्र त्यानंतर काही दिवसांनी मला निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाने सांगतात एका मिनिटाचाही विचार न करता अर्ज मागे घेतला आहे ‘, असेही ते पुढे म्हणाले.

भाजपमध्ये घडलेल्या या रहस्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी, ‘ निवडणुकीच्या सुरुवातीपासून ऋतुजा लटके निवडणुकीला उभे राहू उभ्या राहू नयेत म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी देखील अनेक अडथळे आणण्यात आले मात्र कोर्टात जाऊन त्यांना न्याय मिळाला त्यामुळे अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली होती . भाजपचा इथे पराभव होणार आहे हे माहित होते त्यामुळे पराभवाची खात्री झाल्यावर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला गेला ‘, असे म्हटले आहे .

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलेले असून कोर्टात उपस्थित राहण्यासाठी ते आले होते त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी ,’ अंधेरीच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी मागणी राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून केली होती मात्र त्यांचे हे पत्र म्हणजे भाजपच्याच स्क्रिप्टचा एक भाग होता ‘ अशा शब्दात झाल्या घडामोडीवर मत व्यक्त केले आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट तब्बल 45 हजार मतांनी जिंकणार होता असा सर्वे भाजपकडून करण्यात आला आणि त्यामध्ये पराभव स्पष्ट दिसू लागल्यानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. भाजपने अभ्यास करून आपला उमेदवार मागे घेतलेला असून त्यामध्ये सिंपथी वगैरे काही नाही ‘, असे म्हटले आहे.


शेअर करा