चक्क तीन बायकांनी ‘ त्याला ‘ चाळणीतून पाहिलंय , विशेष म्हणजे तिन्ही..

शेअर करा

आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळवण्यासाठी महाराष्ट्रात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर राजस्थान उत्तर प्रदेश बिहार आणि इतरत्र करवा चौथ नावाचा एक विधि पार पाडला जातो त्यामध्ये पतीला चाळणीतून पाहण्याची प्रथा आहे. अनेक महिला यासाठी उपवास देखील करतात मात्र सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत असून एक व्यक्ती चक्क तीन बायकांसोबत करवा चौथ साजरा करत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला असून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

सदर व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उभा असून त्याच्या तीन पत्नी त्याची पूजा करत असताना दिसत आहेत. पूजा झाल्यानंतर त्या तिघीही त्याच्या पाया पडतात. धक्कादायक बाब म्हणजे या तीनही पत्नी सख्ख्या बहिणी आहेत. मध्य प्रदेशातील चित्रकूट येथील हा व्हिडिओ असल्याचे समजते. सदर व्यक्तीला अनेक नागरिकांनी शुभेच्छा देखील दिलेल्या असून तीन महिलांचे आशीर्वाद घेतल्याने त्याचे आयुष्य तिप्पट होईल असे देखील मत काही जणांनी व्यक्त केले आहे.


शेअर करा