अपघात की घातपात ? पोलीस ठाण्याच्या समोरच नातेवाईकांचा ठिय्या

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे बाबुर्डी रस्त्यावर सावतानगर येथे राहणाऱ्या सागर बाळू आनंदकर ( वय 32 ) यांचा मृत्यू झालेला होता. सदर मृत्यू हा अपघात झालेला नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सागर यांच्या नातेवाइकांनी सोमवारी श्रीगोंदा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते.

उपलब्ध माहितीनुसार, 16 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली होती.श्रीगोंदा शहरातील बायपास रोडवर सागर हे अपघाती अवस्थेत आढळून आल्यानंतर दोन तरुणांनी त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडले होते त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी सागर यांच्या डोक्याला जखम झाल्याचे पाहिले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता.

सागर यांचा अपघात नव्हे तर घातपात झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेला असून पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या समोर हे आंदोलन केले होते.