‘ बुलेट ट्रेनसाठी हजारो कोटी अन खेड्यातील लोकांना..,’ आमदार प्राजक्त तनपुरे सायकलवर

महाविकास आघाडी सरकारने राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदार संघातील विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता . अनेक कामांची टेंडर देखील निघाली होती मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राज्य सरकारने सर्व कामांना स्थगिती दिल्याचा आरोप करत याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे अर्धवट झालेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन सायकलवर निषेध रॅली माजी राज्यमंत्री आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने काढण्यात आली होती.

प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने एक प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेले असून त्यामध्ये 20 ते 22 ऑक्टोबर असे तीनही दिवस ठिकाणी सायकल रॅली काढण्यात येणार आहे. विकास कामांसाठी आग्रही असलेल्या नागरिकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन देखील तनपुरे यांनी केले असून 20 ऑक्टोबर रोजी बारागाव नांदूर येथे सकाळी साडेआठ वाजता निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. मल्हारवाडी येथे दुपारी बारा वाजता सभा आयोजित करण्यात आली आणि दुपारी दोन वाजता घोरपडवाडी येथे देखील निषेध सभा आयोजित करण्यात आलेली होती.

तनपुरे यांनी म्हटले आहे की, ‘ गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाचे वर्दळीचे रस्ते तसेच पडून होते . नागरिकांना याचा मोठा त्रास सुरू झाल्यानंतर या रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी सरकार असताना निधी मंजूर करण्यात आला होता मात्र त्याला सध्याच्या सरकारने स्थगिती दिलेली असून त्याच्या निषेध म्हणून आम्ही ही रॅली काढणार आहोत ‘, असे सांगण्यात आले आहे.